BEST समितीच्या बैठकीत नाराजीनाट्य; सत्ताधारी व विरोधक बैठकीतून बाहेर गेले

बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधारी विरोधकांचे व 'नाराजीनाट्य' रंगले. बैठक सुरू होताच भाजपचे सर्व सदस्य अचानक उठून सभागृहा बाहेर निघून गेले तर त्याच्या पाठोपाठ विरोधी पक्षाचे सदस्यसुद्धाबाहेर गेले. त्यामुळे समितीच्या बैठकीत फक्त समिती अध्यक्षा व महाव्यवस्थापक उपस्थित होते.
BEST समितीच्या बैठकीत नाराजीनाट्य; सत्ताधारी व विरोधक बैठकीतून बाहेर गेले
BEST समितीच्या बैठकीत नाराजीनाट्य; सत्ताधारी व विरोधक बैठकीतून बाहेर गेले
Published on: 

मुंबई : बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधारी विरोधकांचे व 'नाराजीनाट्य' रंगले. बैठक सुरू होताच भाजपचे सर्व सदस्य अचानक उठून सभागृहा बाहेर निघून गेले तर त्याच्या पाठोपाठ विरोधी पक्षाचे सदस्यसुद्धाबाहेर गेले. त्यामुळे समितीच्या बैठकीत फक्त समिती अध्यक्षा व महाव्यवस्थापक उपस्थित होते. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण सभागृह आश्चर्य चकित झाले. अखेर समिती अध्यक्षांनी स्वतःच्या दालनात सदस्यांबरोबर चर्चा केल्यानंतर रखडलेली बैठक पुन्हा घेण्यात आली.

बेस्ट समिती सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव सभागृहात येण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपचे सदस्य सभागृहात बसले होते. विश्वासराव सभागृहात येताच भाजप सदस्य सुनील गणाचार्य उठले आणि काहीही न सांगता सभागृहा बाहेर पडले. तेव्हा त्याच्या सोबत भाजपचे अजय सिंह, संतोष मेढेकर, आकाश पुरोहित, रमाकांत यादव, प्रमोद वाकोडेसुद्धा काहीही न बोलत सभागृहाबाहेर पडले. त्याच्या पाठोपाठ विरोधी पक्षाचे सदस्य नितीन नांदगावकर, सुनील अहिर आणि फैसल खान हेसुद्धा बाहेर पडले.

एका विषयावर चर्चा झाली नाही म्हणून...

याबाबत नाराज सर्व सदस्यांना विचारणा केली असता, आमच्या एका विषयावर बैठक सुरू होण्यापूर्वी बेस्ट अध्यक्षांशी चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती. त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. याला अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनीही दुजोरा दिला. मात्र, बेस्टच्या ३ सप्टेंबरच्या बैठकीवरून बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी याच्यावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्य नाराज असल्याने त्यांनी एकत्र येत हे नाराजीनाट्य घुडवून आणल्याची जोरदार चर्चा बेस्ट वर्तुळात रंगली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in