बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक: कामगारांना कायम सेवेत घ्या;अन्यथा काम बंद आंदोलन

गेली दोन वर्षे बेस्ट उपक्रम, महापालिका आयुक्त, संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांना संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने पत्रे पाठवून, कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या
बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक: कामगारांना कायम सेवेत घ्या;अन्यथा काम बंद आंदोलन

मुंबई : बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. 'समान काम समान वेतन' बेस्टच्या सेवेत कायम समावून घेणे, कामाचे वेळापत्रक योग्य पद्धतीने तयार करणे यासाठी बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसेस चालवणाऱ्या कंत्राटी कामगारांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वेळीच मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला आहे.

गेली दोन वर्षे बेस्ट उपक्रम, महापालिका आयुक्त, संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांना संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने पत्रे पाठवून, कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या; मात्र, कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शुक्रवारी युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी कामगार आयुक्त, उप कामगार आयुक्त यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या.

बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रमाचे कामगार घोषित करून उपक्रमाच्या आस्थापनेवर कायम करावे. जोपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या आस्थापनेवर कायम करण्यात येत नाही, तोपर्यंत ‘समान कामाला समान वेतन’ या तत्त्वाचे पालन करून बेस्ट उपक्रमातील सुरुवातीच्या टप्प्यावरील कायम कामगाराचे वेतन, बोनस/सानुग्रह अनुदान व मोफत बस प्रवास, वैद्याकीय सुविधा, उपहारगृह, प्रसाधनगृह व इतर सर्व सेवाशर्ती लागू कराव्यात, सर्व महिला कामगार, कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा देण्यात याव्यात. यात कपडे बदलण्याची बंदिस्त जागा, स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवादाविरोधात समिती स्थापन करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कामगारांनी कामगार भवन कार्यालयाबाहेर आंदोलन केले. तसेच कामगार आयुक्त व उप कामगार आयुक्तांना निवेदन सादर करत आपल्या मागण्यांकडे जातीने लक्ष घालत योग्य निर्णय घ्यावा, असे विनंती केली.

‘समान कामाला समान वेतन’

‘समान कामाला समान वेतन’ या तत्त्वाप्रमाणे सेवेच्या प्रथम दिवसापासून बेस्ट उपक्रमाच्या कायम कामगारांना देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम या कामगारांना देय्य ठरवून त्याची पूर्ण थकबाकी देण्यात यावी, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले. ‘समान कामाला समान वेतन’ या तत्त्वाप्रमाणे सेवेच्या प्रथम दिवसापासून बेस्ट उपक्रमाच्या कायम कामगारांना देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम या कामगारांना देय्य ठरवून त्याची पूर्ण थकबाकी देण्यात यावी, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in