कॉसमॉस बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक पुरस्कार

समारंभाचे आयोजन गोवा येथे नुकतेच करण्यात आले होते
कॉसमॉस बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक पुरस्कार

मुंबई : कॉसमॉस बँकेस सर्वोत्तम सहकारी बँक पुरस्कार, तसेच सर्वाधिक कर्जवाढ याबद्दल नुकतेच गौरविण्यात आले. फ्रंटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड्स या संस्थेतर्फे सदर पुरस्कार मोठ्या सहकारी बँकांसाठी असलेल्या श्रेणीमध्ये कॉसमॉस बँकेस प्राप्त झाला.

या समारंभाचे आयोजन गोवा येथे नुकतेच करण्यात आले होते. बँकेतर्फे हा पुरस्कार व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे व रिटेल क्रेडिटचे उपमुख्य महाव्यवस्थापक आनंद चाळके यांनी स्वीकारला.

या नॅफकब (दि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप. बँक्स संस्थेने नुकतेच नवी दिल्ली येथे सहकारी बँकांसाठी एका विशेष समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कॉसमॉस बँकेचा गौरव केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी या सन्मानाचा स्वीकार केला. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार गांधी उपस्थित होते.

कॉसमॉस बँकेस नुकताच बेस्ट टेक्नॉलॉजी अवॉर्ड 'बँको ब्ल्यू रिबन २०२३' हा आणखी एक मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. १५ हजार कोटींपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सदर पुरस्कार कॉसमॉस बँकेस प्राप्त झाला आहे. बँकेच्या चीफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर आरती ढोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माजी मुख्य महाव्यवस्थापक डिपार्टमेंट ऑफ सुपरव्हिजन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पी. के. अरोरा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in