बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी आज मतदान; मनसे-शिवसेना युतीला सहकार समृद्धी पॅनलचे आव्हान

बस डेपोसह अन्य ठिकाणी मिळून ३५ मतदान केंद्रांवर १५ हजार ९२ सभासद सोमवारी मतदान करणार असून मंगळवार १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी आज मतदान; मनसे-शिवसेना युतीला सहकार समृद्धी पॅनलचे आव्हान
Published on

मुंबई : बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची चुरस वाढली असून मनसे आणि शिवसेना एकत्र रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या सोसायटीच्या निवडणुकीत मनसे-शिवसेनेला सहकार समृद्धी पॅनलचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक मनसे व शिवसेनेसाठी रंगीत तालीम आहे. दरम्यान, बस डेपोसह अन्य ठिकाणी मिळून ३५ मतदान केंद्रांवर १५ हजार ९२ सभासद सोमवारी मतदान करणार असून मंगळवार १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना एकत्र आले आहेत.

यंदाच्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एससीएसटी वेल्फेअर असोसिएशन, बहुजन एम्प्लॅाईज युनियन या पाच संघटना एकत्र येऊन लढत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेते नेते आणि कामगार संघटनेचे नेते विठ्ठलराव गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात वेगवेगळे उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in