बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! दिवाळीआधी बोनस, पगार जमा होणार

बेस्ट प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट बेस्ट कामगारांना बोनस आणि आगाऊ पगार दिवाळीपूर्वी मिळावी अशी मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी मान्यता दिली.
बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! दिवाळीआधी बोनस, पगार जमा होणार
बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! दिवाळीआधी बोनस, पगार जमा होणार
Published on

मुंबई : बेस्ट प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी आयुक्त भूषण गगराणी यांची भेट बेस्ट कामगारांना बोनस आणि आगाऊ पगार दिवाळीपूर्वी मिळावी अशी मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी मान्यता दिली.

शिवसेना बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष व आमदार सचिन अहिर, शिवसेना उपनेते व शिवसेनेचे डॉ. नितीन नांदगावकर, सल्लागार गौरीशंकर खोत यांनी आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत बेस्ट व्याबस्थापक सोनिया सेठी व आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. बेस्ट कामगारांना बोनस आणि पगार दिवाळीआधी मिळावा असा आग्रह केला.

आयुक्तांनी मान्य केलेल्या मागणीनुसार यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांना १० ऑक्टोबर रोजी पगार देण्यात येणार असल्याचे आश्वासन बेस्ट प्रशासनाने शिवसेना बेस्ट कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आणि बेस्ट कामगार सेनेने आपले पहिले यश संपादित केले.

logo
marathi.freepressjournal.in