गणेश भक्तांच्या सेवेत बेस्ट

१० दिवसांत भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत चालवण्याचा निर्णय घेतल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
गणेश भक्तांच्या सेवेत बेस्ट
Published on

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. उंच उंच गणेश मूर्ती, आकर्षक देखावे पर्यटकांसह भक्तांचे आकर्षण असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १० दिवसांत भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत चालवण्याचा निर्णय घेतल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

मंगळवार १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. सुबक आकर्षक उंच मूर्ती, मंडपातील आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई हे सगळं भक्तांचे आकर्षण ठरते. गणेशोत्सवात भक्तांना मुंबईतील बाप्पाचे दर्शन योग्यरित्या मिळावे यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in