जुलै २०२४ पर्यंत ९०० एसी डबलडेकर प्रवाशांच्या सेवेत बेस्ट उपक्रमाचा दावा

स्वीच मोबॅलिटी व कॉसिस या दोन कंपन्या मिळून ९०० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार आहेत.
जुलै २०२४ पर्यंत ९०० एसी डबलडेकर प्रवाशांच्या सेवेत बेस्ट उपक्रमाचा दावा

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात जुन्या डबलडेकर बसेस होत्या, त्या आता इतिहासजमा झाल्या; मात्र नव्या वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेसने यापुढे मुंबईची सैर करता येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी बेस्टच्या ताफ्यात वातानुकूलित दुमजली बसेस दाखल होत आहेत. सध्या ३५ बसगाड्या ताफ्यात आल्या आहेत. पुढील ९ महिन्यांत जुलै २०२४ पर्यंत टप्प्या टप्प्याने ९०० वातानुकूलित दुमजली बसेस प्रवाशांच्या सेवेत येतील, असा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे. स्वीच मोबॅलिटी व कॉसिस या दोन कंपन्या मिळून ९०० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करणार आहेत.

मुंबईची शान डबलडेकर बसेस आता इतिहासजमा झाली. प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाकडून विविध योजना राबवल्या जात असून, प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यावर भर दिला जातो आहे. प्रवाशांनी बेस्टला पसंती दिली आहे. त्यामुळे उपक्रमाने बेस्टची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसेसचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता. या बसेस आता इतिहास जमा झाल्या आहेत. मात्र मुंबईची शान कायम रहावी यासाठी भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रीक डबलडेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहेत.

-२०० डबलडेकर बसेस स्विच मोबॅलिटी

-७०० बसेस कॉसिस कंपनी करणार

-बेस्टच्या ताफ्यात एकूण ३५ वातानुकूलित दुमजली बस

- सध्या १६ बसेस प्रवाशांच्या सेवेत

-पुढील आठवडयात १५ दुमजली बसेस सेवेत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in