
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यात नवीन वातानुकूलित बस गाड्यांचा समावेश टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यामुळे पुरेशा बस अभावी बंद केलेले बस मार्ग बेस्ट उपक्रमामार्फत पुन्हा सुरू केले जात आहेत. शुक्रवारी विक्रोळी बस आगार ते मुंबई सेंट्रल दरम्यान वातानुकूलित बस गाड्यांचे प्रवर्तन बस मार्ग नव्याने क्र. ए ३० वर सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट काढून या बस मार्गाचा शुभारंभ केला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते. या बस मार्गावरील बसगाड्या मुंबई सेंट्रल आगार- नायर रुग्णालय - संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) - ऑर्थर रोड - संत जगनाडे चौक (लालबाग) - मडकेबुवा चौक (परळ) - हिंदमाता, खोदादाद सर्कल, दादर, महेश्वरी उद्यान - टिळक रुग्णालय - राणी लक्ष्मीबाई चौक - एव्हरार्ड नगर - स. गो. बर्वे मार्ग जंक्शन - अमर महाल - रमाबाई नगर - गोदरेज सोप - विक्रोळी पोलीस स्थानक - टागोर नगर जंक्शन - गांधी नगर - विक्रोळी आगार या मार्गाने धावणार आहे. या बस मार्गावरील बसगाड्या संपूर्ण आठवडा कार्यान्वित असणार आहेत.