नवरात्रोत्सव प्रवाशांसाठी 'बेस्ट' ऑफर;१९ रुपयांत १० बसफेऱ्या प्रवासाची संधी

बेस्ट बस प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर वाढवला आहे
नवरात्रोत्सव  प्रवाशांसाठी 'बेस्ट' ऑफर;१९ रुपयांत १० बसफेऱ्या प्रवासाची संधी

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने नवरात्रोत्सव - दसरा प्रवाशांसाठी विशेष ऑफर दिली आहे. चलो अॅपवर १९ रुपयांचे तिकीट काढल्यानंतर नवरात्रोत्सवात १० बसफेऱ्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत १९ रुपयांच्या तिकिटात नऊ दिवसांत कधीही फक्त १० बसफेऱ्यांचा प्रवास प्रवाशांना करता येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

बेस्ट बस प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर वाढवला आहे. सुट्ट्या पैशांमुळे प्रवासी व वाहकात होणारे वाद, तिकिटासाठी वेळेचा अभाव यामुळे बेस्ट उपक्रमाने डिजिटल तिकीट प्रणाली अमलात आणली आहे. चलो अॅप, स्मार्टकार्डमुळे लाखो प्रवाशांची वेळेची बचत होत असून चालक व प्रवाशांमधील होणारे वाद जवळपास संपुष्टात आले आहेत. चलो अॅपचा सद्य:स्थितीत २२ लाख प्रवासी वापर करत असून डिजिटल तिकीट प्रणाली अधिकाधिक प्रवाशांपर्यत पोहोचावी, यासाठी नवरात्रोत्सवात प्रवाशांसाठी विशेष ऑफर उपलब्ध केल्याचे ते म्हणाले.

असे’ काढा १९ रुपयांचे तिकीट

चलो अॅप डाउनलोड करणे, त्यानंतर बसपास पर्याय निवडावा, बसपास पर्याय निवडल्यानंतर दसरा ऑफर पर्याय निवडल्यानंतर आपली सविस्तर माहिती नोंद करावी, त्यानंतर डेबिट कार्ड, यूपीए, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे १९ रुपयांचे तिकीट मिळणार आहे.

असा’ करता येणार प्रवास!

१९ रुपयांचे तिकीट काढल्यानंतर १० बसफेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे. वातानुकूलित बस, विना वातानुकूलित बस, हो हो बस, तसेच विमान प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या बसने १९ रुपयांच्या तिकिटात प्रवास करता येणार आहे. १९ रुपयांचा बसपास चलो अॅपवर डाउनलोड केल्यानंतर संबंधित प्रवाशाने एका दिवसात १० बस फेऱ्यांचा प्रवास करावा किंवा रोज एक फेरीप्रमाणे १० फेऱ्या पूर्ण कराव्यात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in