बेस्ट प्रवाशांचा लक्झरी प्रवासाचा आनंद घेता येणार

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून दररोज ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात
बेस्ट प्रवाशांचा लक्झरी प्रवासाचा आनंद घेता येणार

प्रवाशांना आता लक्झरी प्रवासाचा प्रत्यक्ष आनंद घेता येणार आहे. मोबाइल अॅपपवर तिकीट बुकिंग केल्यावर संबंधित प्रवाशांची सिट्स आरक्षित राहणार असून, बस कुठपर्यंत आली हे प्रवाशांना समजणार आहे. विशेष म्हणजे, लक्झरी बसचा प्रवास ओला, उबेरपेक्षा स्वस्त असून आरामदायी व गारेगार प्रवास २६ सप्टेंबरपासून करता येणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून दररोज ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करत प्रवाशांना गारेगार प्रवास करता यावा, यासाठी वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या जात आहेत. आता प्रवाशांना लक्झरी प्रवास करणे शक्य होणार आहे. दोन हजार लक्झरी बसेसचा ताफा बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सामील होणार असून, पहिल्या टप्प्यात २०० बसेस लवकरच सामील होणार असून, २६ सप्टेंबरपासून लक्झरी प्रीमियम बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

दोन हजार लक्झरी बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या सगळ्या बसेस वातानुकूलित असून बसमध्ये तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी खास अॅप तयार करण्यात येत असून, सिट्स बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच बस कुठपर्यंत आली, बसमध्ये किती गर्दी याची सविस्तर माहिती अॅपवर मिळणार आहे.

‘या’ मार्गावर प्रीमियम सेवा

सीएसएमटी, नरिमन पॉइंट, ठाणे, मिरा रोड, बीकेसी, पवई, लोअर परळ आदी बस मार्गांवर प्रीमियम बस सेवा उपलब्ध असेल. या प्रीमियम बसचे तिकीट सर्वसाधारण व वातानुकूलित बसेसपेक्षा अधिक असेल; मात्र ओला, उबेरपेक्षा स्वस्त प्रवास करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in