सात वर्षे रिक्त पदावर, १५ दिवसांनी निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याची बढती

बेस्ट उपक्रमातून माजी (विद्युत उपमहाव्यवस्थापक पुरवठा) आर.जे. सिंह, १ जुलै २०१९ रोजी सेवा निवृत्त झाले. तेव्हापासून कालपर्यंत हे पद रिक्त ठेवण्यात आले होते. मात्र, बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी केवळ १५ दिवस निवृत्तीसाठी बाकी असलेल्या मुख्य अभियंता (विद्युत पुरवठा), ग्रेड अ-१, विभाग क्रमांक २१३८१९, डॉ. आर.डी. पाटसुते यांना बढती दिली आहे.
सात वर्षे रिक्त पदावर, १५ दिवसांनी निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याची बढती
Published on

मुंबई - बेस्ट उपक्रमातून माजी (विद्युत उपमहाव्यवस्थापक पुरवठा) आर.जे. सिंह, १ जुलै २०१९ रोजी सेवा निवृत्त झाले. तेव्हापासून कालपर्यंत हे पद रिक्त ठेवण्यात आले होते. मात्र, बेस्टचे महाव्यवस्थापक यांनी केवळ १५ दिवस निवृत्तीसाठी बाकी असलेल्या मुख्य अभियंता (विद्युत पुरवठा), ग्रेड अ-१, विभाग क्रमांक २१३८१९, डॉ. आर.डी. पाटसुते यांना बढती दिली आहे.

मागील कित्येक वर्षापासून बेस्टची आर्थिक परिस्थिती डबगाईला आली आहे. यामुळे उपक्रमात नोकर भरती बंद केलेली असताना या पदावर अचानक बढती व वेतन वाढ करून दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. प्रशासनाने कोणाच्या राजकीय हस्तक्षेपाने ही बढती दिली असा सवाल केला जात आहे.

बढतीला आमचा विरोध नाही. पण, एवढी वर्ष हे पद का भरले नाही. केवळ १५ दिवसासाठी हे पद तत्काळ का भरण्यात आले? याचा आर्थिक फटका बेस्टच्या तिजोरीला पडणार असून पाटसुते यांना निवृत्ती नंतर आर्थिक फायदा होणार आहे.

सुहास सामंत, अध्यक्ष, कामगार सेनेचे

logo
marathi.freepressjournal.in