दिव्यांग प्रवाशासाठी ‘बेस्ट धाव’; हजारो दिव्यांग प्रवाशांना फायदा होणार

१५ सप्टेंबरपासून जुने बेस्टचे बसपास अवैध ठरविण्यात येतील, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.
दिव्यांग प्रवाशासाठी ‘बेस्ट धाव’;  हजारो दिव्यांग प्रवाशांना फायदा होणार

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने दिव्यांग प्रवाशांना घरपोच ओळखपत्र पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. जुने सवलतीचे कागदी ओळखपत्र बदलून ‘स्मार्ट कार्ड बस पास’ देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे हजारो दिव्यांग प्रवाशांना फायदा होणार आहे.

मुंबईत बस सेवा पुरवणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी जुने सवलतीचे ओळखपत्र आणि कागदी ओळखपत्र बदलण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटायजेशन प्रक्रियेद्वारे डिजिटल पद्धतीसाठी अधिकाधिक चालना देण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने ‘चलो अॅप’, ‘स्मार्ट कार्ड बसपास’ आणि ‘एनसीएमसी’ बसपास सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून ज्या प्रवाशांना स्मार्ट कार्ड घरपोच हवे आहे, अशा प्रवाशांसाठी बेस्टचा बसपास घरी पोहोचवण्याची विशेष मोहीम बेस्ट उपक्रम राबवणार आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून जुने बेस्टचे बसपास अवैध ठरविण्यात येतील, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

बेस्ट उपक्रमाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रवासाच्या श्रेणीअंतर्गत प्रवाशांनी ‘बेस्ट चलो अॅप’ डाऊनलोड करून बसपासच्या मान्यतेकरिता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही, पण स्मार्ट कार्ड हवे आहे, अशा प्रवाशांना बेस्टकडून घरपोच कार्ड पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी बेस्टने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in