BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरूअसलेल्या संपामुळे मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मेट्रोकडे मोर्चा वळवला आहे. १९ जूनला महामुंबई मेट्रोने विक्रमी ३,५७,८९५ प्रवाशांची नोंद केली आहे. हा महामुंबई मेट्रोच्या इतिहासातील सर्वाधिक एकदिवसीय प्रवासी आकडा ठरला आहे.
BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास
BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास
Published on

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरूअसलेल्या संपामुळे मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मेट्रोकडे मोर्चा वळवला आहे. १९ जूनला महामुंबई मेट्रोने विक्रमी ३,५७,८९५ प्रवाशांची नोंद केली आहे. हा महामुंबई मेट्रोच्या इतिहासातील सर्वाधिक एकदिवसीय प्रवासी आकडा ठरला आहे.

बेस्ट बससेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी मुंबईकर रिक्षा, टॅक्सी, मेट्रो, खासगी वाहनांचा वापर करू लागला आहे. मेट्रो प्रवासी संख्येत दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. मुंबईकरांनी पर्यायी वाहतूक म्हणून मेट्रोची निवड केली. वाढत्या गर्दीचा विचार करून मेट्रो प्रशासनाने अतिरिक्त फेऱ्याही चालवल्या. त्यामुळे मुंबईच्या मेट्रो नेटवर्कने विक्रमी प्रवासीभार यशस्वीपणे हाताळला.

यापूर्वी महामुंबई मेट्रोने जून २०२५ मध्ये २ लाख ९४ हजार प्रवाशांचा विक्रम नोंदवला होता. मात्र, यंदा १९ जून रोजी नोंदविलेला ३ लाख ५७ हजारांचा आकडा हा त्या विक्रमापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे.

logo
marathi.freepressjournal.in