थर्टीफर्स्टसाठी बेस्टच्या २५ जादा बसेस; गेट वे, जुहू, मार्वे बीचवर प्रवाशांसाठी सुविधा

मुंबईकरांसह अन्य शहरातून येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने रविवार, ३१ डिसेंबरला रात्री २५ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेट वे, जुहू चौपाटी, मार्वे बीचवर प्रवाशांना थर्टीफर्स्टचा आनंद लुटता येणार आहे.
थर्टीफर्स्टसाठी बेस्टच्या २५ जादा बसेस; गेट वे, जुहू, मार्वे बीचवर प्रवाशांसाठी सुविधा

मुंबई : वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या थर्टीफर्स्टसाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. थर्टीफर्स्टला मुंबईकरांसह अन्य शहरातून येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने रविवार, ३१ डिसेंबरला रात्री २५ जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेट वे, जुहू चौपाटी, मार्वे बीचवर प्रवाशांना थर्टीफर्स्टचा आनंद लुटता येणार आहे.

दरवर्षी थर्टीफर्स्टला 'गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीचसह मुंबईतील इतर समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बस मार्गावर रात्री एकूण २५ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच गरज भासल्यास अधिक अतिरिक्त बसेस चालवण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

प्रवाशांच्या मदतीसाठी बस निरीक्षक

प्रवाशांच्या मदतीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

रात्री सेवेत ‘या’ बसेस

  • ८ लिमिटेड – श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते शिवाजी नगर बस स्टेशन

  • ६६ लिमिटेड – इलेक्ट्रिक हाऊस ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन)

  • ए ११६ – श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक

  • ए ११२ – श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते अहिल्याबाई होळकर चौक, (चर्चगेट)

  • २०३ – अंधेरी स्टेशन पश्चिम ते जुहू बीच

  • २३१ श – सांताक्रुझ स्टेशन पश्चिम ते जुहू बस स्टैंड

  • ए २४७ – बोरीवली स्टेशन पश्चिम ते गोराई बीच

  • ए २९४ - गोराई बीच ते बोरीवली स्टेशन पश्चिम

  • २७२ - मालाड स्टेशन पश्चिम ते मार्वे बीच

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in