बेस्टची डबलडेकर आता दिसेल संग्रहालयात

लाल रंगाची डबलडेकर बस प्रथम १९३७ साली मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली होती
बेस्टची डबलडेकर आता दिसेल संग्रहालयात

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक विभाग बेस्टचे वैशिष्ट्य असलेली लाल रंगाची डबलडेकर बस आता सेवेतून काढून घेण्यात येणार आहे. गेल्या सुमारे आठ दशकांपासून मुंबईच्या रस्त्यांवरून धावणारी ही अजस्त्र बस लांबूनही सहजपणे दिसत असे, पण यापुढे ती शोधूनही सापडणार नाही.

मुंबई दर्शनसाठी १९९० साली सुरू केलेल्या डबल खुल्या डबलडेकर बस देखील येत्या ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहेत. सध्या तीन ओपन डेक्स एकूण सात डबलडेकर बस मुंबईत सुरू आहेत. या बस आपल्या सेवेची १५ वर्षे पूर्ण करणार आहेत. त्यामुळे त्यांना सेवेतून बाद करण्यात येणार आहे. मात्र ट्रामप्रमाणे या नामशेष होऊ नयेत यासाठी काही बस वस्तुसंग्रहालयात जतन केल्या जाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

लाल रंगाची डबलडेकर बस प्रथम १९३७ साली मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली होती. देशात केवळ मुंबईतच अशा डबलडेकर बस उपलब्ध असल्याने त्या पर्यटकांचे खास आकर्षण होत्या. १९९० च्या सुरुवातीस बेस्टच्या ताफ्यात तब्बल ९०० डबलडेकर बस होत्या. हळूहळू ही संख्या कमी होत गेली. चालवण्यासाठी अधिक खर्च होत असल्यामुळे २००८ पासून बेस्ट व्यवस्थापनाने या बसची सेवा बंद करण्यास सुरुवात केली. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून, तर बेस्ट व्यवस्थापनाने लाल-काळ्या इलेक्ट्रिक डबलडेकर बस ताफ्यात दाखल केल्या आहेत. मात्र त्यांना जुन्या डबलडेकरची सर नाही, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in