पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्टचा नवा उपक्रम; अधिकाऱ्यांच्या वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांची भर

१५ वाहनांचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्टचा नवा उपक्रम; अधिकाऱ्यांच्या वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांची भर
Published on

पर्यावरणाच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित बसेसचा ताफा वाढीवर भर दिला आहे. आता बेस्ट उपक्रमाने अधिकाऱ्यांच्या वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला आहे. ११७ इलेक्ट्रिक वाहने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी १५ वाहनांचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आले.

वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून आणि इंधन तसेच मोटर वाहनांच्या खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने अंतर्गत वाहतुकीसाठी डिझेलवर चालणाऱ्या मोटार वाहनांऐवजी इलेक्ट्रिकवर चालणारी मोटार वाहने भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण ११७ इलेक्ट्रिक मोटार वाहने समाविष्ट करण्यात येणार असून त्यापैकी ९६ वाहने तयार असून बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते १५ वाहनांचे उद्घाटन कुलाबा बेस्ट भवन आगारात करण्यात आले. त्यावेळी बेस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in