पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी बेस्टचा 'वॅलेट पार्किंग’ उपक्रम

मुंबईचा विकास होत असताना अनधिकृत पार्किंगमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे
 पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी बेस्टचा 'वॅलेट पार्किंग’ उपक्रम

मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी आता बेस्ट उपक्रमाने ‘वॅलेट पार्किंग’ सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाच्या ५ बस आगारात पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबईचा विकास होत असताना अनधिकृत पार्किंगमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी याआधी बेस्ट उपक्रमाने बस आगारात खाजगी वाहनधारकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. आता पार्क प्लस या खाजगी संस्थेच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाच्या ५ बस आगारात पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

स्वतःची गाडी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईत दररोज शेकडो नवीन वाहनांची भर पडते. अरुंद रस्ते, अनधिकृत वाहनांची पार्किंग, रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग यामुळे रस्त्यात कुठेही वाहन पार्क केले जाते. त्यात सुट्टीच्या दिवशी मुंबईकर मोठ्या संख्येने खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. यावेळी गाडी कुठे पार्क करायची ही समस्या भेडसावते. कुलाबा परिसरात ही पर्यटक, कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. पार्किंगची समस्या दूर करण्यासाठीच बेस्ट उपक्रमाने बस आगारात पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे दर लवकरच निश्चित करण्यात येतील, असे ही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in