प्रवाशांच्या गैरवापरामुळे बेस्टची ‘वोगो’ सेवा बंद 

मुंबईकरांची सेकंड लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी वोगो म्हणजे इ स्कूटर सुरू करण्यात आली होती.
प्रवाशांच्या गैरवापरामुळे बेस्टची ‘वोगो’ सेवा बंद 
एक्स @diy_atul
Published on

मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या वतीने  प्रवाशांच्या सेवेसाठी वोगो म्हणजे इ स्कूटर सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवाशांच्या गैरवापरामुळे तसेच स्कूटरच्या चोरीमुळे अखेर ही सेवा बंद करावी लागली. मात्र, सामान्य जनतेला या सेवेचा फायदा होत असल्या कारणाने त्यांच्याकडून ही सेवा पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. 

मुंबईत दाटीवाटीच्या ठिकाणी जिथे बसने प्रवास करता येत नाही अशा ठिकाणी जायचे असल्यास बेस्टच्या वोगो चा वापर मोठ्या प्रमाणात होता. ही स्कूटर चालवण्यासाठी प्रति मिनिट दोन रुपये शुल्क आकारले जात होते. तीस मिनिटांपर्यंत दोन रुपये आणि ३० मिनिटांपेक्षा अधिक चालवल्यास प्रति मिनिट अडीच रुपये आकारण्यात येत होते. तिचा वेग ताशी २० किमी ठेवला होता.

यामुळे झाली सेवा बंद

इ स्कूटरमध्ये बिघाड होऊन नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्याचे हँडल ब्रेक तर कधी ॲप काम करत नव्हते. तर कित्येकदा अल्पवयीन मुलांकडून गैर पद्धतीने वापर होऊ लागला होता. इलेक्ट्रिक बॅटरीची चोरी आणि गाडीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत होते. यामुळे ही सेवा बंद करण्यात असल्याचे बेस्टच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. 

यातून बेस्टला ६ लाखांहून अधिक उत्पन्न 

बेस्ट प्रशासनाकडून  मुंबईतील दादर पश्चिम, सात रस्ता, वरळी, धोबीतलाव, लालबाग या ठिकाणी ही सेवा देण्यात येत होती. वोगो कंपनीच्या ९८० इ स्कूटर या सेवेत दाखल होत्या. या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे बेस्ट उपक्रमाला सुमारे ६ लाख ९४ हजार ७३२ रुपये इतका महसूल मिळाला.

logo
marathi.freepressjournal.in