बेस्टचे संकेतस्थळ हॅक? बेस्ट प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

बेस्टच्या संकेतस्थळावरून काही वीज कंपनीचे तपशील आणि वाहतूक संबंधित हायपरलिंक क्लिक करताना त्रुटी आढळत होत्या तसेच भाषाही बदलल्याचे जाणवले.
बेस्टचे संकेतस्थळ हॅक? बेस्ट प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

मुंबई : शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईतील वीजपुरवठा तसेच वाहतूक सेवा देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या बेस्टचे संकेतस्थळ हॅक झाल्याची अफवा समोर आली. बेस्टच्या संकेतस्थळावरून काही वीज कंपनीचे तपशील आणि वाहतूक संबंधित हायपरलिंक क्लिक करताना त्रुटी आढळत होत्या तसेच भाषाही बदलल्याचे जाणवले. सदर माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरल्याने बेस्टचे संकेतस्थळ हॅक झाल्याचा समज झाला आणि एकच खळबळ उडाली.

दरम्यान, आम्ही एक नवीन संकेतस्थळ सादर करणार आहोत आणि तिचे काम चालू आहे, त्यामुळे ही तात्पुरती त्रुटी आली आहे. तरीही आम्ही संबंधित विभागाला हे पेज बंद करण्याबाबत कळवले आहे. गैरसोयीबद्दल अत्यंत खेद असे, स्पष्टीकरण बेस्ट प्रशासनाने दिले.

logo
marathi.freepressjournal.in