भाभा अणूसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या ; राहत्या घरी घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मनिष शर्मा यांनी आत्महत्या केली.
भाभा अणूसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या ; राहत्या घरी घेतला गळफास

मुंबईतील भाभा अणूसंशोधन केंद्रात काम करणाऱ्या ४८ वर्षीय शास्त्रज्ञाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनिष सोमनाथ शर्मा असं या शास्त्रज्ञाचं नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मनिष शर्मा यांनी आत्महत्या केली. मनिष शर्मा यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने शर्मा यांना हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. शर्मा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? यांचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारच्या सुमारास शर्मा यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे दोघे काही कामानिमित्य बाहेर गेले होते. हे दोघे जेव्हा घरी परत आले तेव्हा त्यांनी शर्मा यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर शर्मा यांच्या पत्नीने ताबडतोब शेजाऱ्यांच्या मदतीने मनिष शर्मा यांना BARCरुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तापासून मृत घोषित केलं.

पोलिसांना मनिष यांच्या घरातून सुसाईड नोट सापडली असून त्यात त्यांनी असं लिहलेलं होते की, "मी माझं आयुष्य संपवतो आहे. त्यासाठी मला माफ करा." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिष शर्मा हे मानसिक आजाराने ग्रस्त होते. मागच्या २० वर्षांपासून त्यांची ट्रिटमेंट BARC रुग्णालयात सुरू होती, 'इंडियन एक्स्प्रेसनेने' याबाबाबचं वृत्त दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in