एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार

वंदे मातरम्च्या कथित अपमानावरून 'द एशियाटिक सोसायटी' च्या व्यवस्थाप न समितीने बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार
एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण : डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवारWikipedia
Published on: 

किरण तारे / मुंबई

वंदे मातरम्च्या कथित अपमानावरून 'द एशियाटिक सोसायटी' च्या व्यवस्थाप न समितीने बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीत, २६ सप्टेंबर रोजी वंदे मातरम् सुरू असताना हॉलमधून बाहेर पडल्याबद्दल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार मुणगेकर यांच्याविरोधात निषेध प्रस्ताव मंजूर करण्यात आला. समितीने हा प्रस्ताव आता सोसायटीच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज आणि सर्वसाधारण सदस्यांकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच एक विशेषसर्वसाधारण सभा बोलावणार आहोत, अशी माहिती एका समिती सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'द फ्री प्रेस जर्नल'ला दिली.

ते म्हणाले, विशेष सभेत मुणगेकरांना अध्यक्षपदावरून बडतर्फ केले जाण्याची दाट शक्यता आहे. तथापि, त्यांनी आपल्या या कृत्याबद्दल माफी मागितल्यास त्यांना माफ केले जाऊ शकते. दरम्यान, जरी मुंजगेकरांना अध्यक्षपदावरून हटवले गेले, तरी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले मुणगेकर हे या सोसायटीचे सामान्य सदस्य म्हणून कायम राहतील.

२६ सप्टेंबर रोजी झालेल्या नवीन व्यवस्थापनांतर्गत सोसायटीच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शेवटी वंदे मातरम् चे संपूर्ण गायन झाले. मात्र, हे गीत संपण्यापूर्वीच मुणगेकर सभागृहातून बाहेर पडले होते. हा काही शासकीय कार्यक्रम नसल्याने गीत संपेपर्यंत तेथेच थांबणे बंधनकारक नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी नंतर मांडली होती.

दुर्दैवी प्रकार

एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी मुणगेकरांचे सभागृहातून बाहेर पडणे 'दुर्दैवी' असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या दिग्गज काँग्रेस नेत्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे की मागील सरकारांकडून राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम् 'ला का संकुचित किंवा मर्यादित केले गेले होते. या संपूर्ण प्रकरणावर भालचंद्र मुणगेकर यांना फोन कॉल आणि मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in