
आगाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक सगळेच निवणुकांच्या तयारीला लागले आहेत. आता येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मुंबईत उमेदवारांमध्ये बदल करू शकतो, याबाबतच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी समोर आली आहे की, भारतीय जनता पक्ष येणाऱ्या काळात काहीतरी मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. मुंबई मधून भारतीय जनता पक्ष आशिष शेलार किंवा विनोद तावडे या दोघांपैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो, अशी शक्याता वर्तवली जात आहे. यामुळे आता भारतीय जनता पक्ष पुढे कोणता निर्णय घेईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
एवढे नव्हे तर आता माजी खासदार किरीट सोमैय्या यांना देखील परत एकदा खासदार बनण्याची संधी मिळू शकते. २०१९ साली मातोश्रीची नाराजी होती म्हणून सोमय्यांचे तिकीट भाजपने कापलं होतं. मात्र, आता काळ बदलला आहे. पर्यायी येणाऱ्या काळात सोमैय्या परत एकदा निवडणुकीत उतरणार का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.
मुंबईत लोकसभेच्या सहा जागा होत्या. त्यापैकी तीन जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आहेत. बाकी दोन जागांवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार बदलणार आहेत. अशी सगळीकडे चर्चा होत आहे. एका मराठी वृत्तावाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.