भाऊ दाजी संग्रहालय : सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन; संग्रहालयाचे लोकार्पण

एखाद्या शहरातील संग्रहालये ही संस्‍कृती आणि इतिहासाची प्रतीके असतात. समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीची साक्षीदार असलेली ही संग्रहालये म्हणजे त्या शहराच्या श्रीमंतीचे दर्शन करून देतात.
भाऊ दाजी संग्रहालय : सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन; संग्रहालयाचे लोकार्पण
एक्स @CMOMaharashtra
Published on

मुंबई : एखाद्या शहरातील संग्रहालये ही संस्‍कृती आणि इतिहासाची प्रतीके असतात. समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीची साक्षीदार असलेली ही संग्रहालये म्हणजे त्या शहराच्या श्रीमंतीचे दर्शन करून देतात. त्यामुळे भावी पिढीला आपला संपन्‍न इतिहास, वारसा समजण्‍यासाठी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भायखळा येथील राणीबागेच्या आवारातील नूतनीकरण केलेल्‍या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्‍यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी कौशल्‍य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्‍यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खा. मिलिंद देवरा, पालिका आयुक्‍त भूषण गगराणी उपस्थित होते.

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय नामकरणाच्‍या ५० वर्षानंतर नव्या रुपात, दिमाखात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय कायम आकर्षण राहिले आहे आणि यापुढेही कायम राहील. यातील दुर्मीळ वस्तू, छायाचित्रे, शिल्‍पाकृती या माध्यमातून नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी प्रास्‍ताविकातून संग्रहालय नूतनीकरणामागील भूमिका स्पष्ट केली. तर उप आयुक्‍त (उद्याने) चंदा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

१० हजार वर्षांपूर्वीची विकसित अवस्थेतील सिंधू संस्कृती स्थित्यंतरांना सामोरे जात आजही नांदते आहे. हडप्‍पा, मोहेंजोदाडो, राखीगढी, भिरडाणा इत्यादी प्राचीन स्थळे ही आपल्या विकसित संस्‍कृतीची उदाहरणे आहेत. आक्रमणांमुळे व अनास्थेमुळे आपण ऐतिहासिक वारसांचे जतन करू शकलो नाही, तथापि, अलिकडच्‍या काळात या संदर्भात जागृती झाली आहे. पुरातन, ऐतिहासिक, कलात्‍मक संस्‍कृतीचे जतन, संवर्धन करणे आपले कर्तव्‍य आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

logo
marathi.freepressjournal.in