होर्डिंग दुर्घटनेच्या गुन्ह्याला भिंडेच जबाबदार; मुंबई पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
Instagram

होर्डिंग दुर्घटनेच्या गुन्ह्याला भिंडेच जबाबदार; मुंबई पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना हा घृणास्पद गुन्हा आहे. त्याला सर्वस्वी भावेश भिंडेच जबाबदार आहे, असा दावा करीत मुंबई पोलिसांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
Published on

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना हा घृणास्पद गुन्हा आहे. त्याला सर्वस्वी भावेश भिंडेच जबाबदार आहे, असा दावा करीत मुंबई पोलिसांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. ही दुर्घटना घडल्यानंतर भिंडे फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी मोहीम राबवली. अखेर राजस्थानात त्याला पकडण्यात यश आले. त्यानंतरच फौजदारी दंड संहितेचे पालन करून अटक केली, असेही स्पष्ट केले.

घाटकोपर येथील छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर असलेल्या १२० बाय १२० फुटांचे भलेमोठ होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेत १६ जणांना आपल प्राण गमवावा लागला. या प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी भावेश भिंडे यांने ही होर्डिंग दुर्घटना देवाची करणी असल्याचा दावा करीत गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांतर्फे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी शुक्रवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. भिंडेचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत सहभाग उघड झाल्यानंतरच पोलिसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१ अंतर्गत अधिकाराचा वापर करून भिंडेला अटक केली. मुळात भिंडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. त्याला अटक करताना फौजदारी दंड सहितेतील आवश्यक तरतुदींचे पालन केले आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करून भिंडेची याचिका फेटाळण्याची विनंती केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in