बँकेचे कर्ज बंद करतो म्हणत ७ लाख उकळले; भाईंदरच्या व्यावसायिकाची फसवणूक

बँकेतील कर्ज ‘बंद’ करून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन करून भाईंदर पूर्वेतील एका व्यावसायिकाची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
बँकेचे कर्ज बंद करतो म्हणत ७ लाख उकळले; भाईंदरच्या व्यावसायिकाची फसवणूक
बँकेचे कर्ज बंद करतो म्हणत ७ लाख उकळले; भाईंदरच्या व्यावसायिकाची फसवणूक'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

भाईंदर : बँकेतील कर्ज ‘बंद’ करून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन करून भाईंदर पूर्वेतील एका व्यावसायिकाची तब्बल ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कर्ज बंद करण्याच्या बहाण्याने आरोपीने २०२३ पासून आतापर्यंत वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम घेतली; मात्र पैसे घेतल्यानंतर बँकेचे कोणतेही काम करून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नवघर पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्व येथे राहणारे मोहम्मद मुस्ताक रफिक शेख यांचा व्यवसाय आहे. याच परिसरातील ओळखीच्या वैभव दिनेश सुमरा याने शेख यांचा विश्वास संपादन केला. सुमरा याने शेख यांना त्यांच्या बँकेतील सुरू असलेले कर्ज बंद करून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून शेख यांनी २०२३ पासून आतापर्यंत वेळोवेळी आरोपीला ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवले. ७ लाख रुपये मिळाल्यानंतरही आरोपीने बँकेशी संबंधित कोणतीही कार्यवाही केली नाही. कर्ज बंद झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी आरोपीकडे आपल्या पैशांची मागणी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in