Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

सूर्या प्रकल्पातून मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाइपलाइनच्या टेस्टिंगदरम्यान रविवारी भाईंदर पूर्वेतील गोडदेव गाव परिसरात पाइपलाइन फुटून मोठा स्फोटासारखा आवाज झाला.
Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
Bhayandar : सूर्या प्रकल्पाच्या पाइपलाइन टेस्टिंगदरम्यान स्फोट; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
Published on

भाईंदर : सूर्या प्रकल्पातून मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाइपलाइनच्या टेस्टिंगदरम्यान रविवारी भाईंदर पूर्वेतील गोडदेव गाव परिसरात पाइपलाइन फुटून मोठा स्फोटासारखा आवाज झाला. नवघर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बनाना लीफ हॉटेलसमोर घडलेल्या या घटनेत पाण्याच्या अतिउच्च दाबामुळे दगड, माती आणि डांबराचे मोठे तुकडे हवेत उडून रस्त्यावर पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली होती. त्यानंतर रविवारी टेस्टिंगदरम्यान पाइपलाइनमध्ये मोठ्या दाबाने पाणी सोडण्यात आले. काही क्षणांतच पाइपलाइन फुटली आणि पाण्याचा प्रचंड फवारा उडाला. यावेळी जमिनीतील दगड, माती तसेच डांबराचे तुकडे परिसरात फेकले गेले. घटनास्थळालगत वाहतूक सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्थानिक भाजप नगरसेवक महेश म्हात्रे यांनी या घटनेवरून सुरक्षा उपाययोजनांच्या अभावाचा आरोप केला आहे. पाइपलाइन टेस्टिंगसारख्या संवेदनशील कामावेळी बॅरिकेडिंग, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांना प्रवेशबंदी आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर पाइपलाइनची गुणवत्ता, जोडणीची मजबुती, टेस्टिंगची पद्धत आणि सुरक्षा व्यवस्थेची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in