भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू

भायखळा परिसरातील एका इमारतीच्या पायलिंगचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी माती व चिखल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा  मृत्यू
भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा मृत्यूछायाचित्र : सलमान अनसारी
Published on

मुंबईः भायखळा परिसरातील एका इमारतीच्या पायलिंगचे काम सुरू असताना शनिवारी दुपारी माती व चिखल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा  मृत्यू
भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा मृत्यूछायाचित्र : सलमान अनसारी

ही घटना भायखळा (पश्चिम) येथील हंस रोडवरील हबीब मॅन्शन येथे दुपारी २.४१ वाजण्याच्या सुमारास पायलिंग कामाच्यावेळी झाली. या दुर्घटनेनंतर जखमी मजुरांना तात्काळ नायर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दोन कामगारांना मृत घोषित केले. तर उर्वरित तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. राहुल (३०) आणि राजू (२८) अशी मृत मजुरांची नावे आहेत. तर मजूर सज्जाद अली (२५), अली (२८) आणि लाल मोहम्मद (१८) अशी जखमींची नावे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in