एमएमआरडीए व महामुंबई मेट्रोचा महिला दिनानिमित्त 'हा' मोठा निर्णय

एमएमएमओसीएलमध्ये २७ टक्के महिला आहेत. या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या ९५८ आहे
एमएमआरडीए व महामुंबई मेट्रोचा महिला दिनानिमित्त 'हा' मोठा निर्णय

मुंबई मेट्रोतील आकुर्ली (२ ए) व एक्सर (मेट्रो ७) या स्थानकावर सर्व कर्मचारी म्हणून महिलांची नियुक्ती झाली आहे. एमएमआरडीए व महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने महिला दिनानिमित्त महिलांचे सबलीकरण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

आकुर्ली व एक्सर रेल्वे स्थानकावर सर्व ७६ कर्मचारी या महिला आहेत. स्टेशन मॅनेजरपासून सुरक्षा स्टाफपर्यंत सर्व कामे महिलांकडेच आहेत. वाहतूक क्षेत्रात व लैंगिक भेद टाळण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्टेशन कंट्रोलर, एक्सेस फेअर ऑफिसर, कस्टमर केअर ऑफिसर, सुरक्षा यांच्यासह सर्व कामे महिलांना दिली आहेत. तीन शिफ्टमध्ये या महिलांना ड्युटी दिली आहे.

एमएमएमओसीएलमध्ये २७ टक्के महिला आहेत. या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या ९५८ आहे. या महिला कर्मचारी देखभाल, मनुष्यबळ, वित्त, प्रशासन, आऊटसोर्स स्टाफ आदी कामे करतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in