गणेशोत्सव म्हणजे कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा सण, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने चार दिवस आधीच टोलमाफी केली आहे. गणपतीच्या सणाला कोकणात जाणाऱ्या वाहनांवर "गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन" अशा आशयाचे स्टीकर्स लावण्यात येणार आहे. यानंतर बस, कार अशा गाड्यांना ही टोलमाफी दिली जाणार आहे.
१६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात ही टोलमाफी लागू राहणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावरुन कोकणात जाणाऱ्या गणेशफक्तांच्या वाहनांना ही टोलमाफी देण्यात येणार आहे.
ही टोलमाफी देण्यासाठी पास देखील दिला जाणार आहे. हा पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस चौक्या व आरटीओ ऑफिसध्ये उपलब्ध केला जाणार आहे. हे पास परतीच्या प्रवासालाही ग्राह्य धरले जाणार असून या पासवर चालकाचे नाव, गाडी क्रमांक, जाण्या-येण्याची तारीख आदी. भरावे लागणार आहे.