सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी ५४,३१६ रुपये प्रति किलो

सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीत १४०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी ५४,३१६ रुपये प्रति किलो
Published on

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबई सराफा बाजारात सोने ५१,२६५ प्रति तोळा झाले. तर चांदीही ५४,३१६ रुपये प्रति किलो झाली.

तसेच इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या संकेतस्थळानुसार, सोमवारी सराफा बाजारात सोने ४३७ रुपयांनी कमी होऊन ५१,२३१ रुपयांवर आले आहे. सोमवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीत १४०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे चांदी ५४,२०५ रुपये प्रति किलोवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,७२३.३६ डॉलर प्रति औंस आणि चांदी २०१७ डॉलर प्रति औंसवर आहे.

logo
marathi.freepressjournal.in