अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची ‘मातोश्री’वर खलबते

छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे हे अजितदादांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर गेले होते
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची ‘मातोश्री’वर खलबते

महिनाभरापूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे बडे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बुधवारी ‘मातोश्री’वर गेले. या भेटीत विविध मुद्द्यांवर खलबते झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे हे अजितदादांसोबत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर गेले होते. या भेटीत सुप्रीम कोर्टातील सुनावणी, मंत्रिमंडळ विस्तार तसेच आगामी अधिवेशन, आदी विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.

शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे एकटे पडल्याचे चित्र होते. ठाकरेंच्या या संकटाच्या काळात राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. बंडखोरांचे आरोप किती वरवरचे आहेत, हे राष्ट्रवादीचे नेते निक्षून सांगत राहिले. एखादा शिवसेना नेताही उद्धव ठाकरेंची एवढ्या चांगल्या प्रकारे बाजू मांडणार नाही, एवढी चांगली बाजू राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in