मुंबईकरांसाठी 'मोठी' बातमी ; मुंबईमध्ये पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू, काय आहेत नियम ?

मुंबई पोलिसांच्या मिशन विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, मुंबई शहरात 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत लाऊडस्पीकर, मिरवणुका आणि मेळाव्यावर बंदी
मुंबईकरांसाठी 'मोठी' बातमी ; मुंबईमध्ये पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू, काय आहेत नियम ?

मुंबईमध्ये पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत लागू राहणार आहे. पोलिस (Mumbai police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत मुंबई शहरात कलम 144 लागू केले आहे.

या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या मिशन विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, मुंबई शहरात 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत लाऊडस्पीकर, मिरवणुका आणि मेळाव्यावर बंदी आहे. कलम 144 नुसार पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे. मिरवणुकांवर बंदी असेल, फटाके फोडण्यास मनाई आहे. लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई आहे. मिरवणुकीत बॅण्डला मनाई आहे. परवानगीशिवाय सामाजिक संमेलने करण्यास मनाई आहे. आंदोलने/उपोषणे प्रतिबंधित आहेत. कर्फ्यू आदेशात खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणे समाविष्ट आहेत. फौजदारी दंड संहितेच्या कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केले जातील. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे कृत्य टाळण्यासाठी कर्फ्यू आदेश लागू केला जातो. मात्र मुंबईकरांना असेही सांगण्यात येत आहे की, शहरात फक्त जमावबंदी असेल संचारबंदी नाही, म्हणजे फक्त पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in