शिंदे गट सोडून आलेल्या नितीन देशमुख यांचा मोठा खुलासा

रात्री ३ वाजता रस्त्यावर उभा होतो. पण मोठ्या संख्येने पोलीस माझ्या मागावर होते. कोणत्या वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं
शिंदे गट सोडून आलेल्या नितीन देशमुख यांचा मोठा खुलासा

गेले दोन दिवस एकनाथ शिंदे राज्याबाहेरून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ४० हून अधिक बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा मुक्काम सूरतमधील हॉटेलमध्ये होता. या सर्व आमदारांसोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. त्यांच्या पत्नीने आपले पती बेपत्ता आहेत अशी तक्रार दाखल केली होती. मात्र आता स्वतः नितीन देशमुख यांनी आता खळबळजनक खुलासा केला आहे. नितीन देशमुख हे शिंदे गट सोडून नागपूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग माध्यमांना सांगितला आहे. 

मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता, माझा बीपी पण एकदम ठीक होता. मला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मला २०-२५ लोकांच्या गराड्यात कसले तरी इंजेक्शन देण्यात आले. माझ्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार करण्याचे प्रकार गुजरातमध्ये करण्यात आले. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. रात्री ३ वाजता रस्त्यावर उभा होतो. पण मोठ्या संख्येने पोलीस माझ्या मागावर होते. कोणत्या वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं. तुमच्यावर उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असून मी त्यांच्यासोबतच राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in