
मुंबई : एकेकाळी उद्योगांचे नंदनवन म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन, एयरबस टाटा आणि बल्क ड्रग पार्क सारखे मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार मागील उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उद्योगधंद्यांसाठी सुरक्षित स्थान म्हणून असेलेली महाराष्ट्राची विश्वासार्हता गमावली असल्याची टिका शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी मागील उद्धव ठाकरे सरकारवर ट्विटद्वारे केली.
उदय सामंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, २०२० मध्ये कोठडीतील मृत्यूच्या आरोपाखाली पोलीस सेवेतून बडतर्फ केल्यानंतर सचिन वझे यांना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करण्यात आले. त्यावेळेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वझे यांना सेवेत पुन्हा बहाल करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिफारीस केली होती. त्यानंतर, सचिन वझे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबाच्या निवासस्थानाखाली जिलेटिनच्या कांड्या /स्फोटकांनी भरलेली कार लावली आणि या गोष्टीचे खासदार संजय राऊत ज्यांचा आघाडी सरकार बनवण्यामध्ये मोठा वाटा होता. यांनी वाझे ला पक्षा तर्फे संरक्षण दिले. त्यांच्या उलेख्ख प्रामाणिक आणि सक्षम म्हणून केला. महाराष्ट्रातील व्यापार जगताला खूप मोठा धक्का देणारी ही घटना होती आणि राज्यावरील विश्वासार्हता कमी होण्याचे हे देखील एक प्रमुख कारण होते. त्यामुळे व्यवसायासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून मुंबईची प्रतिमाही डागाळली, असा आरोप उदय सामंत यांनी केला.
गेल्या एका वर्षात आमच्या सरकारने घेतलेल्या विविध निर्णय आणि धोरणांद्वारे आम्ही आता गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत आहोत. मोठमोठ्या प्रकल्पांचे राजकारण करण्यापेक्षा गुंतवणूकदारांचा राज्य सरकारवरील विश्वास आणि विश्वास उडवल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, असेही त्यावेळी ट्विटमध्ये म्हणाले आहे.