उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; घरातीलच माणसं शिंदे गटात सामील

अशा धाडसी माणसाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे शिंदे यांच्या प्रेमापोटी मी येथे आलो आहे. सगळं बरखास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; घरातीलच माणसं शिंदे गटात सामील

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बीकेसी येथे सुरू असलेल्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरे उपस्थित दाखवली. यावेळी ते शिंदे गटात असल्याचेही त्यांनी सांगितले. निहार ठाकरेंनंतर आता जयदेव ठाकरेंनी शिंदे गटाची वाट धरली, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काय म्हणाले जयदेव ठाकरे ?

महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्यासारख्या धाडसी माणसाची गरज आहे, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो, असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले. आम्ही ठाकरे काहीही लिहून घेऊन येत नाही. एकनाथ माझा आवडता आहे, आता ते मुख्यमंत्री झाल्यामुळे मला एकनाथरावांशी बोलायचे आहे. पाच-सहा दिवस गेले. मला एक एक कॉल येत आहेत. अहो, शिंदे गटात गेलात का? हे ठाकरे कोणाशी बांधलेले नाहीत. शिंदे यांनी दोन चार भूमिका केल्या, ज्या मला आवडल्या. अशा धाडसी माणसाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे शिंदे यांच्या प्रेमापोटी मी येथे आलो आहे. सगळं बरखास्त करा, राज्यात पुन्हा निवडणुका घ्या... राज्यात पुन्हा शिंदे यांची सत्ता येऊ द्या असे जयदेव ठाकरे यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in