नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणारा बिहारी आरोपी गजागाड

दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयित आरोपी माहीम आणि मिनारा मशिदीजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणारा बिहारी आरोपी गजागाड

मुंबई : नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या बिहारी आरोपीला गजाआड करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले. मोहम्मद तन्वीरअली इमाम अन्सारी असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध अशाच प्रकारे भागलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ६ डिसेंबरला अंधेरी येथे राहणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलीचा अज्ञात तरुणाने विनयभंग केला होता. दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर संशयित आरोपी माहीम आणि मिनारा मशिदीजवळ येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी सलग पाच दिवस तिथे पाळत ठेवून मोहम्मद तन्वीरअली अन्सारीला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. पिडीत मुलगी ही तिच्या घरासमोरच खेळत होती. यावेळी तिथे मोहम्मद आला आणि त्याने तिच्याशी बोलण्याचा बहाणा करून अश्‍लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तो पळून गेला होता. घरी गेल्यानंतर या मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली होती.

 याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पाच दिवसांत आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या माहीम येथील कापड बाजार रोड, हनिफाबाई मंजिल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतो. त्याच्याविरुद्ध बिहारच्या भागलपूर पोलीस ठाण्यात अशाच एका पोक्सोच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in