Mumbai : ट्रेलरवरून अवजड मशीन कोसळून दुचाकीस्वार जखमी; ईस्टर्न एक्स्प्रेसवरील विक्रोळी येथील घटनेत चालकाला अटक

पूर्व उपनगरात शनिवारी पहाटे एका ट्रेलरमधून नेण्यात येणारे एक मोठे यंत्र दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले.
Mumbai : ट्रेलरवरून अवजड मशीन कोसळून दुचाकीस्वार जखमी; ईस्टर्न एक्स्प्रेसवरील विक्रोळी येथील घटनेत चालकाला अटक
Published on

मुंबई: पूर्व उपनगरात शनिवारी पहाटे एका ट्रेलरमधून नेण्यात येणारे एक मोठे यंत्र दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. त्यामध्ये तो जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीजवळ पहाटे हा अपघात घडला. पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून त्याला अटक केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव विपुल पांचाळ (४४) असे असून कांदिवली येथे जात होता. तेव्हा ट्रेलरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामध्ये असलेले अवजड यंत्र पांचाळ यांच्या अंगावर पडले. स्थानिकांनी पांचाळ यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. ट्रेलर चालकाला निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल अटक केली आहे, असे विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in