अदानींना मागे टाकत बिल गेट्स श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर

ब्लूमबर्गच्या पहिल्या १० अब्जाधीशांच्या यादीकडे पहिले तर बर्नार्ड अर्नॉल्ट गुरुवारी सर्वाधिक कमाई करणारे
अदानींना मागे टाकत बिल गेट्स श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर

अमेरिकेच्या शेअर बाजारातील उसळीमुळे बिल गेट्स यांच्या संपत्तीत २.५८ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्याच वेळी भारतीय शेअर बाजारात तेजी असतानाही गौतम अदानी यांच्या संपत्तीत केवळ १.४६ डॉलर अब्जची वाढ होऊ शकली आणि यामुळे बिल गेट्स यांनी जगातील पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीत अदानींना मागे टाकले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये अदानी पाचव्या तर बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत. तसेच मुकेश अंबानी पहिल्या १० मधून बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्गच्या पहिल्या १० अब्जाधीशांच्या यादीकडे पहिले तर बर्नार्ड अर्नॉल्ट गुरुवारी सर्वाधिक कमाई करणारे ठरले. त्यांची संपत्ती ५.७९ अब्जने वाढून १४३ डॉलर बिलियन इतकी झाली आहे. बिल गेट्स चौथ्या स्थानावर आहेत आणि त्यांची संपत्ती २.५८ अब्जने वाढून ११६ बिलियन झाली आहे. तितक्याच संपत्तीसह गौतम अदानी पाचव्या क्रमांकावर आहेत.

अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्क अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. गुरुवारी त्यांची संपत्ती ४.३६ अब्ज डॉलरने वाढली आणि आता त्यांची एकूण संपत्ती २४८ अब्ज डॉलर झाली आहे. तसेच जेफ बेझोस यांनी बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांची संपत्ती एका दिवसात १.३६ डॉलर अब्जने वाढून १४६ डॉलर बिलियन झाली आहे.

याशिवाय लॅरी पेज १०४ डॉलर अब्ज संपत्तीसह सहाव्या, वॉरेन बफेट १०२ अब्ज संपत्तीसह ७व्या स्थानावर, सर्गे ब्रिन ९९.४ डॉलर अब्ज संपत्तीसह आठव्या स्थानावर आहेत. त्याच वेळी स्टीव्ह बाल्मरच्या संपत्तीत गुरुवारी २.५० अब्ज डॉलरची वाढ झाली आणि त्यांची एकूण संपत्ती ९७.३ डॉलर अब्ज झाली असून ते सध्या नवव्या स्थानावर आहे. लॅरी एलिसनची संपत्ती देखील १.३४ डॉलर अब्ज डॉलरने वाढून ९५.५ डॉलर बिलियन झाली आहे आणि ते १०व्या क्रमांकावर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in