देवनार डम्पिंग ग्राऊंडवर बायोसीएनजी गॅस निर्मिती;एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

एक हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून बायोसीएनजी गॅस निर्मिती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून महानगर गॅस लिमिटेड कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर बायोसीएनजी गॅस निर्मिती;एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

मुंबई : कचरामुक्त मुंबईसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर एक हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून बायोसीएनजी गॅस निर्मिती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून महानगर गॅस लिमिटेड कंपनीसोबत करार करण्यात येणार आहे.

मुंबईत दररोज सहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणाऱ्या कचऱ्याची देवनार कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाते. तसेच ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी सोसायट्यांना १२० लिटरचे दोन डबे देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यात २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती किंवा आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ नुसार कचरा विल्हेवाट सोसायट्यांना बंधनकारक करण्यात येऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून वाढत्या कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

घरगुती, इंडस्ट्रीसाठी वापर

मुंबईत सद्यस्थितीत दररोज सुमारे ६ हजार ३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये सुमारे ५० ते ६० टक्के ओला कचरा असतो. यातील जास्तीत जास्त कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोसीएनजी गॅस निर्मितीचा पालिकेचा विचार आहे. यासाठी नागरिकांनी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आवाहन केले असून कचरा पेट्याहीवाटल्या जाणार आहेत. या गॅसचा वापर संबंधित संस्थेकडूनच होणार असून घरगुती आणि व्यावसायिक कामांसाठी इंधन म्हणून या गॅसचा वापर करता येऊ शकतो. ओल्या कचऱ्यापासून बायोसीएनजी अद्ययावत पद्धतीने बनवण्यात येणार असल्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीचा प्रश्न मिटणार असून रोगराईलाही आळा बसणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in