छत्रपतींच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी चालू देणार नाही; चित्रा वाघ यांचा इशारा

छत्रपतींच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी चालू देणार नाही; चित्रा वाघ यांचा इशारा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगासह उर्फी जावेदवर ताशेरे ओढले
Published on

अभिनेत्री मॉडेल उर्फी जावेदच्या वेषभूषेवर टीका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत तिच्यासह महिला अयोग्य आणि तिच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्यांवरही ताशेरे ओढले. 'एक बाई तोकडे कपडे घालून रस्त्यांवर अंगप्रदर्शन करते. महिला आयोग याचे समर्थन करते का?' असा सवाल त्यांनी केला होता. यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले होते की, " कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. एखादी वेशभूषा ही ठराविक व्यक्तीला अश्लील वाटू शकते, पण इतरांनाही तसेच वाटेल असे नाही. त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ घालवणार नाही."

यानंतर चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्योत्तर दिले की, "आयोगाचे काम हे महिलांचा सन्मान जपणे आणि मान राखणे आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाने जाब का नाही विचारला? यावर त्यांनी उत्तर दिले की, अशा गोष्टीवर त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. मग, वेळ कशासाठी घालवायचा आहे? एखादी महिला मुंबईत अंगप्रदर्शन करत फिरते. समाजमाध्यमांमध्ये अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाही? यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही." अशा कडक शब्दात त्यांनी टीका केली.

पुढे त्या म्हणल्या की, "विरोध धर्माला नाही पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुूरु आहे. त्या विकृतीला विरोध आहे. उर्फीला विरोध नाही, तर तिच्या नंगानाचला विरोध आहे. कुणी काय कपडे घालावे आणि कुणी घालू नये, यावर काय बोलणार? आधी कपडे तर घाला मग ठरवा. समाजाचे स्वास्थ हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिथे राजकारण करण्याची गरज नाही, पण तसे राज्यात झाले नाही. राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी नंगानाच सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचे उत्तर उर्फीला समर्थन करणाऱ्यांनी द्यावे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार झालाय. असला नंगा नाच चालू देणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in