Mumbai : विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांचे टॅब द्या! भाजपची महापालिकेकडे मागणी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि काही व्यक्तींच्या मक्तेदारीला आळा घालून विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केली आहे.
Mumbai : विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांचे टॅब द्या! भाजपची महापालिकेकडे मागणी
Mumbai : विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांचे टॅब द्या! भाजपची महापालिकेकडे मागणीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि काही व्यक्तींच्या मक्तेदारीला आळा घालून विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केली आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अनोळखी कंपन्यांऐवजी नामांकित जागतिक कंपन्यांचे टॅबलेट पीसी व डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना टॅबलेट पीसी देण्याच्या उपक्रमाचे स्वागत करतानाच, सध्या पुरविण्यात येणाऱ्या उपकरणांच्या दर्जाबाबत साटम यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे टॅब प्रमाणित दर्जाचे नसून ते नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचेही नाहीत, असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.

शाळांमध्ये बसवण्यात आलेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनल्सच्या दर्जाबाबतही तक्रारी येत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले.

कमी दर्जाची उपकरणे चढ्या दराने?

महापालिकेला काही कंपन्यांकडून कमी दर्जाची डिजिटल उपकरणे चढ्या दराने पुरविली जात असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. या कंपन्यांच्या महापालिकेतील संबंधित व्यक्तींशी असलेल्या कथित साटेलोट्याची चौकशी करण्याची गरजही त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केली. महापालिका गेल्या काही वर्षांपासून अनोळखी कंपन्यांच्या टॅबवर जो खर्च करीत आहे, त्याच्याशी साधर्म्य असलेल्या किमतीत नामांकित कंपन्यांचे टॅब बाजारात उपलब्ध असल्याचे प्राथमिक दरतुलनेतून दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in