आमदार, उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले; काय म्हणाले गिरीश महाजन?

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलेल्या बंडावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले अनेक खुलासे, म्हणाले हे मिशन सोप्पे नव्हते
आमदार, उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडले; काय म्हणाले गिरीश महाजन?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि महाराष्ट्रात सत्तानंतर घडले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी तब्बल ५० शिवसेना आमदारांना सोबत घेऊन पक्षावर दावा केला. त्यानंतर जे घडले ते संपूर्ण जगणे पाहिले. दरम्यान, या सर्व गोष्टींमध्ये भाजपचा मोठा हात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. अशामध्ये आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अनेक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील त्यावेळी उपस्थित होते.

एका कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले, या गोष्टीचा विचार केला की आम्हालाही विश्वास बसत नव्हता. मात्र आम्ही ऑपरेशन सुरु केले. हे मिशन वाटते तितके सोप्पे नव्हते. उद्धव ठाकरेंना कंटाळून शिवसेनेसारख्या पक्षातून ४०-५० जण बाहेर पडले. आधी १७-१८ जणांना घेऊन बाहेर पडायचे ठरले, पण नंतर हा आकडा ५० वर गेला, हे खूप कठीण होते. जर मध्येच हे मिशन फेल झाले तर काय करायचे? असा प्रश्न आम्हाला पडत होता. मात्र पुढारी कसे असतात, तुम्हाला माहिती आहे", असे बोलताना गिरीश महाजन यांनी थंड वेळ थांबत मुख्यमंत्र्यांकडे पाहिले आणि एकच हशा पिकला.

पुढे ते म्हणाले की, "एकीकडे मुख्यमंतीर एकनाथ शिंदे यांना सांगत असतो की किमान ५ तास तरी झोपा. पण, ते पहाटे ३ वाजेपर्यंत काम करत असतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहेत. महाराष्ट्रातले सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावत आहेत. दुसरीकडे, आपण सर्वांनी बघीतले की अडीच वर्षात ते मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरीसुद्धा चढले नाहीत. घरून काम करतो, कॉम्पुटरवर काम करतो, असेच काम त्यांनी केले." असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीकादेखील केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in