भाजप सरकार हर घर तिरंगांच्या नावाने राजकारण करत आहेत - भाई जगताप

“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात आली होती
भाजप सरकार हर घर तिरंगांच्या नावाने राजकारण करत आहेत - भाई जगताप

तिरंगा हा आपल्या देशाची आन-बान-शान आहे, पण केंद्रातील भाजप सरकार हर घर तिरंगांच्या नावाने इव्हेंट करुन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्याचे राजकारण करत आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. त्याशिवाय स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेखही न केल्यामुळे भाई जगताप यांनी मोदींवर ताशेरे ओढले.

“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात आली होती. “लोकांना भ्रमित करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप हे हर घर तिरंगाच्या नावाने राजकारण करत आहे. असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी मुंबईत केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in