Sanjay Raut : खासदार संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहेत आरोप?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता
Sanjay Raut : खासदार संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; काय आहेत आरोप?

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला असून २४ जानेवारीला त्यासंदर्भात सुनावणी होणार आहे.' यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. याप्रकरणी शिवडी न्यायालयात संजय राऊत यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता यासंदर्भात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या 'सामना' या वृत्तपत्रातून एका अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी कथित शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता.

संजय राऊत यांनी काय दावा केला होता?

मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात तब्बल १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. किरीट सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिले देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणे दाखवून हा घोटाळा केला. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने हा घोटाळा केल्याचा दावा त्यांनी केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in