मुघलांनी केले नाही ते भाजपच्या नेत्यांनी केले - पवन खेरा

जे काम मुघल करू शकले नाहीत ते भाजपच्या नेत्यांनी केले आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला केला.
मुघलांनी केले नाही ते भाजपच्या नेत्यांनी केले - पवन खेरा
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभरातील जनतेच्या मनात राग आहे. केवळ महाराजांचा पुतळाच कोसळला नाही तर लोकांचे मनही दुखावले आहे. जे काम मुघल करू शकले नाहीत ते भाजपच्या नेत्यांनी केले आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपकार केल्याच्या अविर्भात माफी मागितली. धमकीच्या स्वरात मागितलेली माफी आम्हाला मंजूर नाही. भाजप शिवद्रोही असून त्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. शिवाजी महाराजांच्या अस्मितेशी चालवलेला खेळ मुळीच खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा खेरा यांनी दिला.

योग्य व्यक्तींनी लिहिलेला इतिहास वाचला पाहिजे - खासदार छत्रपती शाहू

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा प्रकार राजकारणापलीकडचा आहे. या घटनेने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. १९ व्या शतकात कोण इतिहास लिहित होते हे सर्वांना माहीत आहे, योग्य व्यक्तींनी लिहिलेला इतिहास वाचला पाहिजे, असे खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून भाजप सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. महाराज आपले दैवत असून भाजपने त्यांचा अपमान केला आहे. तरीही काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजप पसरवत आहे, फेक नरेटिव्ह पसरवणे हा भाजपचा डीएनए आहे, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in