भाजप नेत्यांची हितेंद्र ठाकूरांसोबत तीन तास चर्चा

भाजपचा पाचवा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला
भाजप नेत्यांची हितेंद्र ठाकूरांसोबत तीन तास चर्चा

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील या तीन आमदारांची मते भाजपला मिळावीत म्हणून आज विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या विरार येथील कार्यालयाय भेट घेतली. यावेळी त्यांच्या तीन तास झालेल्या चर्चेनंतर प्रसारमाध्यमंशी बोलतांना, राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच बविआचा पाठींबा आणि मते विधानपरिषदेच्या भाजप उमेदवारांना मिळून भाजपचा पाचवा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळी मुंबईतील सागर बंगल्यावर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणविस, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि गिरीष महाजन यांच्यात बविआच्या पाठींब्याबाबत चर्चा झाली. त्यात शुक्रवारी आ प्रसाद लाड यांनी आ ठाकूर यांच्या भेटीचा तपशील ठेवला. त्यानंतर फडणविस यांनी दरेकर आणि महाजन यांना विरारला जाऊन आ ठाकूर यांना भेटून यायच्या सूचना दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in