

मुंबई : मुंबईत भाजपने आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निवड करण्यासाठी नवीन धोरण आखले आहे. यानुसार आगामी निवडणुकीत इच्छुकांना गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी भाजपने मुंबईतील २२७ वॉर्डामध्ये निरीक्षक नेमले असून, मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांचे आता रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील कित्येक वर्षापासून मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु, भाजपला काही जागांमुळे मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवणे शक्य झाले नाही. दरम्यान, शिवसेनेची पडल्यानंतर या निवडणुकीत दोन शकले यंदा मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे.
मुंबई मूल्यांकन प्रक्रियेत वॉर्डमध्ये आगामी भाजपकडून निवडणुकीप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही विधानसभा माजी नगरसेवकांच्या कामाचे सखोल मोजमाप केले जात आहे. या केलेली कामे, त्यांची परिणामकारकता, भाजपने दिलेले कार्यक्रम पूर्ण केले आहेत की नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यावर भर दिला जाणार आहे. तसेच लोकांमध्ये उमेदवाराची असलेली प्रतिमा देखील तपासली जाणार आहे. ज्या माजी नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक नसेल किंवा जे निष्क्रिय आढळतील, त्यांना उमेदवारी नाकारली जाणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत तरुण उमेदवारांना अधिकाधिक संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. तर पक्षाच्या वतीने प्रत्येक वॉर्डसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे उमेदवारांची सखोल तपासणी करतील. आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांची माहिती देतील. त्यानंतरच भाजपकडून उमेदवारीचे तिकीट दिले जाणार आल्याची माहिती मिळत आहे.
...अशी असेल भाजपची रणनीती
शिंदे यांच्या शिवसेनेला ६५ ते ७५ जागा देण्याचा विचार दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेंच्या शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो यामुळे भाजप सर्वाधिक जागा लढण्याच्या विचारात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात जिंकून येणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप होईल ज्या जागांवर तेढ निर्माण होईल त्या जागांबाबत महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून पेच सोडवण्याचा प्रयत्न येत्या काळात महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरेंचे माजी नगरसेवक फोडण्याची रणनीती आखली जाणार