उड्डाणपुलाच्या लोकार्पणाआधीच भाजप-शिवसेना आमनेसामने ;श्रेयवाद, घोषणाबाजीच्या गोंधळातच लोकार्पण

हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्स्प्रेसवे यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे
उड्डाणपुलाच्या लोकार्पणाआधीच भाजप-शिवसेना आमनेसामने ;श्रेयवाद, घोषणाबाजीच्या गोंधळातच लोकार्पण

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणाऱ्या, बोरिवली पश्चिमेकडील आर. एम. भट्टड मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण होण्याआधीच श्रेयवाद रंगला. शनिवारी पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडण्याआधी भाजप-शिवसेना यांच्यात बॅनरबाजी, घोषणाबाजी पहायला मिळाली. या गोंधळातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पणप्रसंगी माजी आमदार तथा म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार विलास पोतनीस, आमदार मनिषाताई चौधरी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष संध्या दोशी-सक्रे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, आर/मध्य विभागाचे सहायक आयुक्त जावेद वकार, विविध माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in