मलबार हिल मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा); अडीच लाखांहून अधिक मतदारांचा कौल कोणाला 

Maharashtra assembly elections 2024 : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा वेग वाढला असून उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचाराची धुरा सांभाळली आहे. मुंबईतील ३६ मतदार संघापैकी मलबार हिल मतदार संघ. दोन मित्र पक्ष राजकीय शत्रू झाल्यानंतर प्रथमच २०२४ च्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकले आहेत.
मलबार हिल मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना (उबाठा); अडीच लाखांहून अधिक मतदारांचा कौल कोणाला 
Published on

विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा वेग वाढला असून उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचाराची धुरा सांभाळली आहे. मुंबईतील ३६ मतदार संघापैकी मलबार हिल मतदार संघ. दोन मित्र पक्ष राजकीय शत्रू झाल्यानंतर प्रथमच २०२४ च्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकले आहेत.

मलबार हिल मतदार संघात भाजपचा बोलबाला असला तरी गेल्या काही वर्षांत राजकारणाचे समीकरण बदल्याने निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. भाजपचे विद्यमान आमदार मंगल प्रभात लोढा हे आमदार म्हणून निवडून आले असून भाजपने पुन्हा एकदा लोढा यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भेरुलाल दयालाल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मलबार हिल मतदार संघात एकूण ८ उमेदवार रिंगणात उतरले असले तरी खरी लढत लोढा विरुद्ध चौधरी अशीच होणार आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सहा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक सर्वंच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

मलबार हिल मतदार संघ तसा भाजपचा गड. मलबार हिल मधून १९९५ ते २०१९ या काळात सहा वेळा मंगलप्रभात लोढा हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तर  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात महायुतीला ३९ हजारांहून अधिक मतांचे मताधिक्य मिळाले. या राजकीय यशामागे मतदार संघातील लोढा यांचा उत्तम जनसंपर्क असल्याचे मानले जाते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोढा यांनी काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा ७० हजारापेक्षा अधिक मते मिळवली होती. ही निवडणूक लोढा यांच्यासाठी सातव्यांदा आमदार होण्याची संधी आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजी, महायुतीतील मित्र पक्षांला जागा मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा, या सगळ्याचा तालमेल बघता भाजपसाठी ही निवडणूक टेंशन देणारी ठरणार आहे. मविआचे उमेदवार भेरुलाल दयालाल चौधरी यांची ही मलबार हिल मतदार संघात मतदारांमध्ये पकड असल्याचे सांगण्यात येते.

मलबार हिल मतदार संघात एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून यापैकी ४ अपक्ष उमेदवार नशीब आजमावणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणे ही तितकीच सोपी नाही, असे मलबार हिल मतदार संघातील जाणकारांचे म्हणणे आहे.

८ उमेदवार नशीब आजमावणार 

भेरुलाल दयालाल चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मंगल प्रभात लोढा - भारतीय जनता पार्टी

केतन किशोर बावणे - राईट टू रिकॉल पार्टी

सबीणा सलीम पठाण - एआय एम पॉलिटिकल पार्टी

अली रहीम शेख - अपक्ष

रवींद्र रमाकांत ठाकूर - अपक्ष

विद्या नाईक - अपक्ष

शंकर सोनवणे - अपक्ष

मतदारांची संख्या

पुरुष - १,३५,०९४

महिला - १,३५,४५४

तृतीयपंथी - १२

एकूण - २,६०,५६०

logo
marathi.freepressjournal.in