समाजात फूट पाडण्याचे काम भाजपचे - चेन्नीथला

मुंबईच्या विकासासाठी राजीव गांधी यांनी काम केले आहे. देशाला २१ व्या शतकात घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प केला व त्यादृष्टीने योजना आखून त्यांची अंमलबजावणीही केली.
समाजात फूट पाडण्याचे काम भाजपचे -  चेन्नीथला
ANI
Published on

मुंबई : मुंबईच्या विकासासाठी राजीव गांधी यांनी काम केले आहे. देशाला २१ व्या शतकात घेऊन जाण्याचा त्यांनी संकल्प केला व त्यादृष्टीने योजना आखून त्यांची अंमलबजावणीही केली. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले त्याची फळे आज देशाला मिळत आहेत. देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी त्यांनी काम केले. राहुल गांधी हे सुद्धा सद्भावनेच्या मार्गाने विघटनवादी शक्तींच्या विरोधात काम करत आहेत, भाजपा देशात धर्म व जातीच्या नावाने फूट पाडण्याचे काम करत आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपवर केला. मुंबईचे व काँग्रेसचे वेगळे नाते आहे.

१८८४ साली मुंबईत काँग्रेसची स्थापना झाली, १९४२ साली महात्मा गांधी यांनी चले जाव चा नारा दिला त्याचाच परिणाम ब्रिटीश सत्ता गेली. आजचे राज्यकर्ते सत्तेसोटी काहीही करु शकतात पण राजीव गांधी यांनी असले राजकारण केले नाही. पंतप्रधान झाले त्यावेळी देशात दंगली पेटल्या होत्या, दिल्लीच्या रस्त्यावर उतरून त्यांनी दंगली आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. आसाम, पंजाब, आणि मिझोराम पेटला होता पण शांतता करार करुन स्थानिक पक्षांकडे सत्ता सोपवली. आत्ताचे सत्ताधारी मात्र पक्ष फोडून सरकार स्थापन करत आहेत. देशाच्या एकात्मतेसाठी राजीव गांधी यांनी रक्त वाहिले, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक म्हणाले.

राजीव गांधी यांनी संगणक क्रांती आणली, भारताला २१ व्या शतकात आणले, आणखी काही दिवस ते जिंवत राहिले असते तर भारत जगात महासत्ता बनला असता. बदलापूर मधील घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, १५ ऑगस्टला मुख्यमंत्री बदलापूरमध्ये होते पण त्यांनी या घटनेकडे लक्ष दिले नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता,हा मुख्यमंत्री फक्त खूर्ची वाचवणारा आहे. बदलापूर प्रश्नी महिला काँग्रेस बदलापूरात जाऊन आवाज उठवतील. महाराष्ट्रात महिला अत्याचार सातत्याने होत असताना महायुती सरकारला त्याची खंतही वाटत नाही, ज्यांच्या राज्यात महिला अत्याचार होत आहेत त्यांना सत्तेतून पायउतार करा, असे आवाहन केले. राजीव गांधी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात सद्भावना स्थापित करण्याचा संकल्प आजच्या दिनी करु, अशी प्रतिज्ञा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थितांना दिली.

राजीव गांधी व मुंबईचे वेगळे नाते आहे, त्यांचा जन्म तर मुंबईतील आहेच पण सरचिटणीसपदी असताना मुंबईत पदयात्रा काढणारे, मुंबईला १०० कोटी निधी देणारे ते पहिले नेते आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे जनक राजीव गांधी आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले, ते आरक्षण महाराष्ट्राने ५० टक्के केले. निवडणूक हरलो तरी चालेल पण देशातील १८ वर्षांच्या युवकांना मतदाना हक्क दिला. शिक्षण काही लोकांची मक्तेदारी राहू नये यासाठी शिक्षणाची दारे उघडी केली.एससी,एसटी मागास समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली, असे मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in